दळणवळण :
रस्ते :
राज्यातील रस्त्यांची एकूण लांबी २,३३,६६४ कि. मी. आहे. (सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषदांच्या देखभालीखालील रस्ते)
रेल्वे :
राज्यातील रेल्वे मार्गाची एकूण लांबी ५९०२ कि.मी. आहे. (कोकण रेल्वे मार्गाची लांबी धरून). राज्यातील प्रमुख रेल्वे मार्गांची सूची पुढीलप्रमाणे,-
१. मुंबई - दिल्ली मार्ग (मध्य रेल्वेमार्ग)
२. मुंबई - अहमदाबाद मार्ग (पश्चिम रेल्वेमार्ग)
३. मुंबई - कोलकता मार्ग
४. मुंबई - चेन्नई
५. मुंबई - सिकंदराबाद
६. मुंबई - कोल्हापूर
७. दिल्ली - चेन्नई मार्ग (ग्रॅट - ट्रंक मार्ग)
८. भुसावळ - सुरत
महाराष्ट्राला सुमारे ७२० कि. मी. चा सागरी किनारा लाभला आहे. महाराष्ट्रात २ महत्त्वाची बंदरे आहेत
Labels:
भूगोल
रस्ते :
राज्यातील रस्त्यांची एकूण लांबी २,३३,६६४ कि. मी. आहे. (सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषदांच्या देखभालीखालील रस्ते)
राज्यातून जाणार्या राष्ट्रीय महामार्गांची सूची पुढीलप्रमाणे -
क्र. | राष्ट्रीय महामार्गाचे नाव | महामार्ग क्रमांक |
१ | मुंबई-नाशिक - आग्रा महामार्ग | ३ |
२ | मुंबई - पुणे - बेंगळूरू - चेन्नई | ४ |
३ | न्हावाशेवा - कळंबोली - पळस्पे | ४ ब |
४ | हाजीरा-सुरत-धुळे-नागपूर-कोलकाता | ६ |
५ | वाराणसी- नागपूर-हैद्राबाद-बेंगळूरू (कन्याकुमारी महामार्ग) | ७ |
६ | मुंबई-अहमदाबाद - जयपूर - दिल्ली | ८ |
७ | पुणे - सोलापूर-हैद्राबाद-विजयवाडा | ९ |
८ | सोलापूर - विजापूर - चित्रदुर्ग | १३ |
९ | निजामाबाद - जगदलपूर | १६ |
१० | पनवेल - गोवा - मंगलोर | १७ |
११ | पुणे - नाशिक ५० | ५० |
राज्यातील रेल्वे मार्गाची एकूण लांबी ५९०२ कि.मी. आहे. (कोकण रेल्वे मार्गाची लांबी धरून). राज्यातील प्रमुख रेल्वे मार्गांची सूची पुढीलप्रमाणे,-
१. मुंबई - दिल्ली मार्ग (मध्य रेल्वेमार्ग)
२. मुंबई - अहमदाबाद मार्ग (पश्चिम रेल्वेमार्ग)
३. मुंबई - कोलकता मार्ग
४. मुंबई - चेन्नई
५. मुंबई - सिकंदराबाद
६. मुंबई - कोल्हापूर
७. दिल्ली - चेन्नई मार्ग (ग्रॅट - ट्रंक मार्ग)
८. भुसावळ - सुरत
मुंबई ते पणजी या मार्गावर धावणारी, कोकणातील सर्व जिल्हे जोडणारी कोकण रेल्वे हा महाराष्ट्रातील भूषणावह, आदर्श असा दळणवळण प्रकल्प आहे.
आंतरराष्ट्रीय विमातळ - मुंबई, पुणे व नागपूर या तीन ठिकाणांहून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू आहे. आंतरदेशीय विमानतळे - मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर व नांदेड येथे आहेत.महाराष्ट्राला सुमारे ७२० कि. मी. चा सागरी किनारा लाभला आहे. महाराष्ट्रात २ महत्त्वाची बंदरे आहेत
१. मुंबई पोर्ट ट्रस्ट (एम.बी.पी.टी.)
२. न्हावाशेवा (जे. एन. पी. टी./ जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट) तसेच राज्यात ४८ छोटी बंदरे आहेत.
राज्यातील पोस्ट सेवेची कार्यालये मार्च, २००७ अखेर १२,५९९ होती. यांपैकी ११,३१५ ही ग्रामीण क्षेत्रात असून उर्वरित १२८४ शहरी क्षेत्रात आहेत.
मार्च ,२००७ अखेरपर्यंत राज्यात ६४.४४ लाख दूरध्वनी जोड (टेलिफोन कनेक्शन्स)होते.
सप्टेंबर, २००७ अखेरपर्यंत २७९.१४ लाख इतके मोबाईलधारक (भ्रमणध्वनीधारक) होते. त्यापैकी ११५.२५ लाख (४१.३%) हे केवळ मुंबई मंडल मध्ये होते.
सप्टेंबर, २००७ अखेरपर्यंत २७९.१४ लाख इतके मोबाईलधारक (भ्रमणध्वनीधारक) होते. त्यापैकी ११५.२५ लाख (४१.३%) हे केवळ मुंबई मंडल मध्ये होते.
0 comments:
Post a Comment