खनिज संपत्ती :
महाराष्ट्रात सापडणार्या प्रमुख खनिजांची माहिती पुढे दिली आहे. तसेच ती खनिजे ज्या प्रमुख जिल्ह्यांत सापडतात त्या जिल्ह्यांचीही सूची दिली आहे.
१. भारतातील मँगेनीजच्या एकूण साठ्यापैकी सुमारे ४०% मँगेनीजचा साठा महाराष्ट्रात आहे. तसेच मँगेनीज उत्पादनात महाराष्ट्राचा भारतात दुसरा क्रमांक लागतो.
जिल्हे - नागपूर, भंडारा, सिंधुदुर्ग.
२. भारतातील बॉक्साईटच्या एकूण उत्पादनापैकी २०% उत्पादन महाराष्ट्रात होते. महाराष्ट्रात जवळ जवळ ८० दशलक्ष टन इतका बॉक्साईटचा साठा आहे. -
जिल्हे - कोल्हापूर, सातारा, सांगली, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.
३. कायनाईट - देशातील कायनाईटच्या एकूण उत्पादनात महाराष्ट्राचा हिस्सा १५% इतका आहे. जिल्हा - भंडारा.
४. क्रोमाईट - देशातील एकूण क्रोमाईटच्या साठ्याच्या १०% इतका साठा महाराष्ट्रात आहे.
जिल्हे - भंडारा, सिंधुदुर्ग, नागपूर.
५. डेलोमाईट - देशातील एकूण साठ्यांपैकी ९% डेलोमाईटचा साठा महाराष्ट्रात आहे. -
जिल्हे - रत्नागिरी, यवतमाळ.
६. चुनखडी - देशातील एकूण चुनखडीच्या साठ्यापैकी ९% साठे महाराष्ट्रात आहेत.
जिल्हे - यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, अहमदनगर.
७. महाराष्ट्रात दगडी कोळशाचा साठा ५,००० दशलक्ष टन आहे. देशाच्या एकूण दगडी कोळशाच्या साठ्याच्या तो ४% इतका आहे.
जिल्हे - नागपूर, चंद्रपूर,
८. भारताच्या एकूण लोहखनिज साठ्यांपैकी २% लोहखनिजसाठा महाराष्ट्रात आहे.
जिल्हे - चंद्रपूर, गडचिरोली, गोंदीया, नागपूर, सिंधुदुर्ग.
९. ग्रॅनाईट - गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत सापडतो.
१०.तांबे - नागपूर व यवतमाळ जिल्ह्यात अत्यल्प प्रमाणात सापडते.
११.अभ्रक - सिंधुदुर्ग जिल्ह्यात सापडते.
१२.टंगस्टन - नागपूर जिल्ह्यात सापडते.
१३.बेसॉल्ट खडक - दक्षिण कोकण व महाराष्ट्राचा अतिपूर्व भाग वगळता महाराष्ट्रात सर्वत्र सापडतो.
खनिज तेल : मुंबईनजीक समुद्रातील ‘मुंबई हाय’ या क्षेत्रात खनिज तेल, तसेच नैसर्गिक वायू सापडतात. रायगड जिल्ह्यात उरणजवळ समुद्रात खनिज तेलाचे साठे आढळतात.
Labels:
भूगोल

भारतातील सर्व प्रकारच्या खनिजांच्या सुमारे ३.३% खनिजांचे उत्पादन महाराष्ट्रात होते. महाराष्ट्राच्या पूर्व व दक्षिण या दोनच भागात प्रामुख्याने खनिजे सापडतात. त्यामुळे याच भागात खनिजाधारीत उद्योगांचा विकास झालेला आढळतो. महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ (एम.एस.एन.सी.) १९७३ मध्ये नागपूर येथे स्थापन करण्यात आले. त्याचा उद्देश खनिज संपत्तीचे जास्तीतजास्त उत्पादन व विकास करणे हा आहे.
0 comments:
Post a Comment