प्रस्तावना -
निरनिराळ्या पंचवार्षिक योजनांमधून सरकारची धोरणे मांडली जातात. तसेच एका पंचवार्षिक योजनेत वस्तुसंग्रहालये, पुरातत्त्व संशोधनाच्या जागा यांचे जतन करण्याचे धोरण सुस्पष्टपणे मांडले गेले होते. जिल्हा आणि विभाग स्तरावर महत्त्वाच्या वास्तू, जागा, संग्रहालये स्थापन केली जावीत असे त्यानुसार ठरले. त्यामुळे प्रादेशिक स्तरावर नागपूर, औरंगाबाद आणि नाशिक येथे संग्रहालये आहेत. कोल्हापूर, सिंदखेडराजा (बुलढाणा जिल्ह्यात), सातार्यात ३ कलादालने, उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर, नांदेड जिल्ह्यात माहूर या ठिकाणी जिल्हास्तरीय संग्रहालये जतन करण्यात आली आहेत. यातील काही व्यक्तिगत संग्रहालये आहेत.
तसेच काही ऐतिहासिक महत्त्वाच्या स्थळांवर, महत्त्वाच्या व्यक्तींच्या नावे संग्रहालये व्हावीत असे सरकारचे धोरण प्रत्यक्षात राबवले जात आहे. त्यात छत्रपती राजर्षी शाहू, राम गणेश गडकरी, वीर सावरकर, आणि महात्मा फुले यांच्या स्मृती जतन करणारी संग्रहालये सुरूही झाली आहेत.
१९८४ मध्ये प्रसिद्ध सिनेनट श्री. चंद्रकांत मांढरे यांनी स्वत:चे घर आणि संग्रहात असलेली सर्व पोट्रेटस् व निसर्गचित्रे सरकारने संग्रहालयात जतन करावीत यासाठी दान केली आहेत. कोल्हापुरातील त्यांच्या संग्रहात जवळजवळ ३०० चित्रे आहेत. अनेक कलाप्रेमी मंडळी या संग्रहाचा आस्वाद आता घेऊ शकतात.
काही संग्रहालयांची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.
रिझर्व बँकेचे चलनाचे संग्रहालय, मुंबई.
जानेवारी, २००५ मध्ये या संग्रहालयाची मुंबई येथे स्थापना झाली. हे भारतातील पहिलेच चलनांचे संग्रहालय आहे. तेव्हाचे देशाचे राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी त्याचे उद्घाटन केले.
चलन व्यवहारात कस-कसे बदल झाले, नाणी, नोटांचे बदलते आकार, रंग याची संग्रहालयामुळे कल्पना येते. निरनिराळे धातू, मिश्र धातू यांचा या संग्रहात समावेश आहे. इ. स. पूर्व ६ व्या शतकापासून ते आजतागायत चलनात झालेली स्थित्यंतरे त्यामुळे सर्वांसमोर येतात. नाणी, नोटा, धनादेश(चेक्स), हुंडी यांमध्ये निरनिराळ्या धातूंचा, कागदाचा उपयोग - चलनात कसा होत गेला हे यावरून समजते.
लहान मुलांसाठी माहिती देणारी दालने त्यात स्वतंत्रपणे मांडली आहेत. त्यातून नाण्यांचा इतिहास, माहिती ही खेळांमधून सांगितली आहे.
फिरोजशहा मेहता मार्गावर, फोर्ट भागात, अमर बिल्डिंग या ठिकाणी मुंबईत हे रिझर्व बँकेने सुरू केलेले संग्रहालय आहे.
नॅशनल मेरिटाईम म्युझियम, मुंबई
मुंबईत हे संग्रहालय आहे. भारतीय नौदलाने हे संग्रहालय तयार केले आहे. इतर देशातील मॉडेल्स घेऊन त्यावरून मुंबईत बांधण्यात आलेल्या बोटींचे नमुने त्यात आहेत. नौसेना किंवा नौदल याविषयी रस असणार्या पर्यटकांना व अभ्यासकांना हे प्रतिकृतींचे संग्रहालय एक वेगळाच आनंद देते.
डॉ. भाऊ दाजी लाड म्युझियम (व्हिक्टोरिया - अल्बर्ट म्युझियम), मुंबई .
मुंबईत भायखळा येथे या संग्रहालयात शस्त्रास्त्रे, चर्मकला, कुंभारकाम, हस्तीदंतावरील कोरीव काम, प्राचीन लिखित दस्तऐवज अशा विविध विषयांवरील माहिती व वस्तूंचा संग्रह आहे. हे मुंबईतील जिजामाता उद्यानात असून या संग्रहालयातून बॉंबे नॅचरल हिस्ट्री सोसायटी या महत्त्वपूर्ण संस्थेची स्थापना (१८८३) झाली.
दी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, मुंबई. (BNHS) :
निसर्ग रक्षण, संवर्धन यासाठी काम करणारी ही १२५ वर्षे जुनी सामाजिक संस्था आहे. या संस्थेत नैसर्गिक साधन-संपत्तीच्या शाश्वत, सशक्त समतोल विकासासाठी संशोधन व अभ्यास चालतो. फोर्ट भागात १८८३ मध्ये ६ ब्रिटिश आणि २ भारतीयांनी एकत्र येऊन या संस्थेची सुरुवात केली. सुप्रसिद्ध पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली यांनीही या संस्थेचे अध्यक्षपद भूषविले. डॉ. सलीम अली यांच्या बरोबरीनेच बी. एन. एच. एस. चे नाव घेतले जाऊ लागले एवढे भरीव काम त्यांनी केले आहे. डॉ. अली सुमारे ७८ वर्षे या संस्थेचे अध्यक्ष होते.
या संस्थेच्या संग्रहालयात असंख्य पक्षी-प्राणी यांची छायाचित्रे, माहिती आहे. तसेच विविध झाडे, फळे, फुले यांचीही तपशीलवार माहिती आहे. निसर्गाचा इतिहास, जैवविविधता विषयांवरील हे आशिया खंडातील सर्वांत मोठे संग्रहालय आहे. सुमारे २६००० पक्षी, २७५०० विविध प्राणी व ५०००० कीटक यांची माहिती आपल्याला येथे मिळते.
छत्रपती शिवाजी वस्तुसंग्रहालय, मुंबई.
प्रिन्स ऑफ वेल्स या नावाने पूर्वी प्रसिद्ध असलेले हे संग्रहालय मुंबईत, फोर्ट विभागात उभारलेले आहे. प्राचीन स्थापत्य, वास्तुशास्त्र, वास्तुकला जतन करण्याचा प्रयत्न येथे केलेला आहे. निरनिराळी पेंटिंग्ज, चित्रकलेचे नमुने इथे जतन केले आहेत.
हेराज इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन हिस्ट्री अॅण्ड कल्चर (हेराज संग्रहालय), मुंबई.
मुंबईतील सेंट झेवियर्स महाविद्यालयाच्या परिसरात हे लहानसे संग्रहालय १९२६ साली सुरू झाले. स्पेनमधील रहिवासी हेन्री हेरास यांनी भारतात आल्यावर संस्कृती, परंपरा, पुरातत्त्व शास्त्र या दृष्टीने भारताचा अभ्यास व्हावा या हेतूने ही संस्था सुरू केली. या हेराज इन्स्टिट्यूटच्या अंतर्गत संग्रहालय स्थापन करण्यात आले आहे. मेसोपोटेमिया संस्कृतीतील काही वस्तू, मातीच्या वस्तू, नाणी, ख्रिश्चन-लाकडी कोरीवकामाचे नमुने, प्राचीन काळातील मातीची भांडी, हस्तीदंतावरील कोरीव काम, गंधर्व, मथुरा, गुप्त-काळातील दस्तऐवज, मेरी- येशू यांच्या मूर्ती या संग्रहालयात ठेवलेल्या आहेत.
भारत इतिहास संशोधन मंडळ, पुणे.
पुण्यात हे संशोधन केंद्र आणि संग्रहालय १९१० मध्ये सुरू झाले. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी या संस्थेची स्थापना केली. इतिहासाचा अभ्यास आणि सांस्कृतिक वारसा जतन करणारे हे संग्रहालय-ग्रंथालय चित्रांचे दालन, दस्तऐवज यांनी सज्ज आहे. पुण्यात मध्यवर्ती वस्तीत हे संग्रहालय आहे.
राजा दिनकर केळकर संग्रहालय, पुणे.
२०,००० हून अधिक पेंटिंग्ज, असंख्य पुरातन वस्तूंचा संग्रह पुण्यातील या संग्रहालयात आहे. पुण्यात मध्यवर्ती भागात हे वस्तुसंग्रहालय आहे. गुजराथ, राजस्थान, कर्नाटक, केरळ अशा ठिकठिकाणच्या लाकडी, दगडी कोरीव कामाचे नमुने, दिवे, कुलपे, अडकित्ते, पेन-दौती, तसेच अनेक प्राचीन घरगुती वस्तूंचा संग्रह येथे पाहण्यास मिळतो. तसेच महिलांच्या संबंधी वस्तूंची स्वतंत्र विभागात मांडणी केलेली असून यातून सांस्कृतिक ठेवा, परंपरा यांचे जतन केले आहे. महाराष्ट्र सरकारच्या पुरातत्त्व खात्याकडे हे सोपवले आहे.
महात्मा फुले वस्तुसंग्रहालय , पुणे.
हस्तकला, हस्तोद्योग, काही शेती संबंधित आणि औद्योगिक उत्पादने या ठिकाणी आहेत. १८९० मध्ये लॉर्ड रेम्युझिअम म्युझियम नावाने ते सुरू झाले. हत्तीपासून ते सील माशापर्यंत प्रत्येक प्राण्याची शरीररचना बारकाईने पाहायची असेल, रचनेचा अभ्यास करायचा असेल, तर या ठिकाणी एकत्रितपणे ठेवलेल्या अनेक शरीररचनांचा उपयोग अभ्यासकांना होतो.
लोकमान्य टिळक संग्रहालय, पुणे.
‘केसरी’ दैनिकाचा छापखाना पुण्यात जिथे होता, तिथेच लोकमान्य टिळकांनी वापर केलेल्या वस्तू जतन केलेल्या आहेत. त्यातच मंडालेच्या तुरुंगात असताना टिळकांनी लिहिलेल्या ‘गीतारहस्य’ या ग्रंथाची एक प्रतही ठेवली आहे.
आदिवासी संग्रहालय, पुणे.
पुणे रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या या संग्रहालयात भारतातील अनेक आदिवासी जमातींबद्दलची माहिती जमवलेली आहे. गोंडवन, सह्याद्री या रांगांमध्ये राहाणारे सर्व आदिवासी समजून घेण्यासाठी त्याचा उपयोग होतो. आदिवासींच्या वापरात असलेल्या वस्तू, त्यांच्या जीवनातील हुबेहुब उभे केले प्रसंग, छायाचित्रे, पुस्तके यांचा संग्रह येथे पाहण्यास मिळतो.
श्री भवानी संग्रहालय, औंध.
सातारा जिल्ह्यातील औंध येथे हे संग्रहालय आहे. जयपूर, कांगरा, मुघल, पंजाब, विजापूर, पहाडी आणि मराठा शैलीतील १५ व्या ते १९ व्या शतकातील चित्रकला - रंगकामाचे नमुने या ठिकाणी आहेत. औंधचे राजे भवनराव पंतप्रतिनिधी यांनी १९३८ मध्ये ते सुरू केले. हेन्री मूर यांनी केलेले माता व बालकाचे प्रसिद्ध शिल्प श्रीभवानी म्युझियम मध्ये आहे. अनेक पाश्चिमात्य चित्रकारांची चित्रे या संग्रहालयात आहेत. भवानराव पंतप्रतिनिधी यांनी स्वत: संग्रहित केलेला, जतन केलेला हा अनमोल ठेवा आहे.
Labels:
संग्रहालये

1 comments:
माझ्या कडे पोर्तगिज कालीन नाणे आहे ...पाहिजे असेल तर योग्य किंमत देऊन नाणे घेऊन जा
पत्ता- तालुका भुदरगड जिल्हा कोल्हापूर
Post a Comment