Marathit Logo Marathit

सहिष्णुतेचा दुष्काळ

अग्रलेख- Maharashtr Times
महाराष्ट्राच्या काही भागात सध्या दुष्काळसदृष्य परिस्थिती आहे हे वास्तव कुणीही नाकारू शकत नाही . अशा संकटाच्यावेळी प्रादेशिक वाद बाजूला ठेवून महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांनी एकत्र येऊन दुष्काळाशी सामना करणे अपेक्षित आहे . मात्र सत्तेत बसलेली मंडळी सध्या दुष्काळाच्या निमित्ताने एकमेकांशी लढायला लागली आहेत . राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत दुष्काळग्रस्त १५ जिल्ह्यांकरिता एकीकडे मदत जाहीर केली जात असताना दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त ११ तालुक्यांकरिता प्रत्येकी दहा कोटी रुपये बंधाऱ्यांच्या कामाकरिता देण्याचा प्रस्ताव आणून तो मंजूर करण्याचा डाव राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपमुख्यमंत्री अजित पवार काही मंत्र्यांनी रचला होता . कलाकार असो की पत्रकार साऱ्यांना उपदेशाचे डोस पाजण्याचा मक्ता आपल्यालाच प्राप्त झाला आहे , अशा अविर्भावात वावरणाऱ्या अजित पवार यांना आपण संपूर्ण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहोत याचा विसर पडल्याने त्यांनी हा प्रस्ताव रेटला असावा . त्यांच्याच पक्षाचे मातब्बर नेते छगन भुजबळ यांनी विदर्भ , मराठवाडा , खान्देश या भागातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्याही मंत्र्यांच्या मनातील खदखद प्रकट केली . नितीन राऊत यांनीही रुद्रावतार धारण केला . . महाराष्ट्रातील तालुक्यांसाठी निधी लाटताना त्यामध्ये सांगलीबरोबर सातारा जिल्ह्यातील तालुक्यांचा समावेश करून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाही या कटकारस्थानात मम म्हणत सहभाग घेतला आहे . मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हेच अशाप्रकारे पक्षपात करून प्रादेशिकवाद जोपासत असतील तर महाराष्ट्राच्या अन्य भागातील दुष्काळग्रस्त जनतेने दाद कुणाकडे मागायची हा खरा सवाल आहे . विधिमंडळ अधिवेशनात राज्यपाल के . शंकरनारायणन यांचे निधी वाटपासंबंधीचे निर्देश ठेवले गेल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाला प्रादेशिकवादाचे वळण घेतले आहे . राज्यपालांनी महाराष्ट्राचा दौरा करून मगच निधी वाटपाबाबत भूमिका घेणे गरजेचे होते , अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केली . पवार यांनी राज्यपालांना टीकेचे लक्ष्य करताच त्यांना महाराष्ट्रात मुदतवाढ मिळाली ही सहजपणे घडलेली घटना आहे यावर कुणीही विश्वास ठेवणार नाही . राज्यपालांना मुदतवाढ मिळाली त्याच दरम्यान राहुल गांधी यांनी पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागाचा मुख्यमंत्र्यांच्या विनंतीवरून दौरा केला . त्यानंतर शरद पवार यांनी पुन्हा राज्यपालांना लक्ष्य केले . राहुल यांच्या दौऱ्यामुळे तरी राज्यपालांना दुष्काळाचे गांभीर्य जाणवले असेल , असे टोले पवारांनी लगावले . ही साठमारी सुरू असतानाच पाणीपुरवठामंत्री लक्ष्मणराव ढोबळे ( हे राष्ट्रवादीचेच आहेत ) यांनी यंदाच्या दुष्काळाची तुलना १९७२ च्या अत्यंत भीषण दुष्काळाशी केली . आता आपण असे बोललोच नाही , अशी सोयीस्कर भूमिका ढोबळे घेत आहेत . याच कोलाहलात सांगलीतील जत येथील ४४ तालुक्यातील राष्ट्रवादीच्या काही मंडळींनी आपल्याला कर्नाटकात सामील व्हायचे असल्याची आवई उठवून दिली . वरकरणी या घटना वेगवेगळ्या दिसत असल्या तरी त्यामध्ये समान सूत्र असून राज्यपालांच्या निर्देशानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची मंडळी पश्चिम महाराष्ट्रातील टंचाईसदृश्य परिस्थितीचा बागुलबुवा करून निधी खेचण्याचा प्रयत्न करीत आहेत . २००३ साली राज्यात अशीच परिस्थिती उद््भवली होती . त्यावेळी पश्चिम महाराष्ट्रात मोठे संकट असल्याचे उच्चरवात सांगून तत्कालीन राज्यपाल महंमद फजल यांना त्या भागाचा दौरा करण्यास भाग पाडले गेले होते . त्यानंतर किमान १६०० कोटी रुपयांची मदत या भागासाठी उपलब्ध करण्यात आली होती . यंदा नोव्हेंबर महिन्यात तशीच परिस्थिती दिसू लागताच राज्यपालांना दौरा करण्याची विनंती केली गेली होती . मात्र शंकरनारायणन यांनी त्याला प्रतिसाद दिला नाही . याचा अर्थ पश्चिम महाराष्ट्रातील टंचाईप्रवण ८७ तालुक्यांत सारे आलबेल आहे असे कुणाचेच म्हणणे नाही . तेथील परिस्थिती चिंताजनक आहे . तेथील जनतेलाही चारा , पाणी उपलब्ध झाले पाहिजे यात कुणाचे दुमत नाही . मात्र मोठ्याने रडणाऱ्या मुलाला आई जेवायला घालत असेल आणि हळू आवाजात रडणाऱ्या मुलाची उपेक्षा होत असेल तर तो दुसऱ्या मुलावर अन्याय आहे . विशेष करून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ही दोन्ही पदे पश्चिम महाराष्ट्राकडे असताना या विभागातील नेत्यांनी अधिक व्यापक भूमिका घेणे गरजेचे आहे . केवळ तोंडाने राष्ट्रीय आवाक्याच्या बाता मारून चालत नाही ते कृतीतूनही दिसावे लागते .

शिवाजी महाराजांची थोरवी

वस्तुनिष्ठ भूमिकेवरून विचार केला तरच शिवाजीमहाराजांच्या थोरवीचे आकलन होईल. त्यांनी स्वराज्यसंस्थापना केली याचा अर्थ त्यांनी मुसलमानांचे वर्चस्व नाहीसे केले. युरोपीय व्यापार्‍यांच्या वखारी लुटल्या आणि जाळल्या याचा अर्थ त्यांच्या आक्रमक वृत्तीला पायबंद घातला. ते लोकोत्तर पुरूष होते याविषयी वाद असण्याचे कारण नाही. जगातील कोणत्याही विभूतीच्या अंगी आढळणारे अनेक असाधारण गुण त्यांच्या ठायी एकत्रित झाले होते. लहानपणापासून नाना प्रकारची संकटे सोसल्यामुळे त्यांना जगाचा विशेष अनुभव होता आणि त्याचा योग्य उपयोग करून घेण्याची बुद्धी स्वभावात:च त्यांच्या ठिकाणी होती. त्यांची राहणी साधी होती. त्यामुळे शिपाईगड्यांत त्यांच्यासंबंधी आपुलकी होती. त्या बळावर त्यांनी आपल्याभोवती जीवास जीव देणारे असंख्य मित्र गोळा केले होते.

महाराज नीतिमान होते. त्यांना कोणतेही व्यसन नव्हते. शत्रूच्या स्त्रियांना त्यांनी सुखरूपपणे त्यांच्या घरी पोहोचविल्याचे प्रसंग त्यांच्या चरित्रात आहेत. आपल्या आचरणाने त्यांनी प्रजेला नीतीचा धडा शिकविला होता. त्यांच्या राजनीतीत शक्ती व युक्ती या दोहींचा समन्वय होता. ते जसे शूर योद्धे होते तसे बुद्धिमान मुत्सद्दी होते. ध्येय आणि व्यवहार यांची सांगड घालण्याचे कौशल्य त्यांना साधले होते.

त्यांची धर्मावर नि:सीम श्रद्धा होती. धर्मभावना त्यांच्या अंत:करणात सदैव जागृत होती. राष्ट्रोन्नती धर्मोन्नतीवर अवलंबून आहे अशी त्यांची दृढ धारणा होती. तिच्या अनुषंगाने त्यांची सारी कार्ये होत. राज्यव्यवहाराबाबत त्यांचा स्वभाव अत्यंत कडक होता. गुन्हेगाराला ते जबरदस्त शिक्षा दिल्याशिवाय राहात नसत. प्रतापराव गुजरांवरचा त्यांचा राग इतिहासात नमूद आहे. कारभारात महाराज कडक असले तरी मुळात ते अंत:करणाने कोमल व दयाशील होते.

त्यांनी पैसा गोळा केला. कारण सैन्य ठेवण्यास पैसा उभारावा लागतो. आणि सैन्याशिवाय शत्रूला तोंड देता येत नाही. त्यांनी थोड्या पैशांत व थोड्या खर्चात फौजफाटा व गड, किल्ले यांची अत्यंत उत्तम व्यवस्था ठेवली. अडाणी मावळ्यांना त्यांनी हाताशी धरले व स्वराज्यस्थापनेचे कार्य केले. यात त्यांची योजकता व्यक्त होते. त्यांच्या पश्चात हे कार्य कुणास साधले नाही. कारण मराठ्यांशी जशी परंपरा ऐकू येते तशी मावळ्यांची परंपरा ऐकू येत नाही. या वस्तुस्थितीचा कदाचित आनुवंशिकतेशी संबंध असावा.

राज्यकारभारात महाराज सदैव सावध होते. त्यांचे हेरांचे खाते होते. त्यांच्या हेरांत बहिर्जी नाईक प्रसिद्ध आहे. कारभार चालविण्यासाठी त्यांनी अष्टप्रधान नेमले होते. त्यांच्यात कामाची वाटणी करण्यात आली होती, त्यांची शिस्त अत्यंत कडक होती. त्यांनी जिंकलेल्या मुलुखावर चौथाई म्हणून एक नवीन हक्क बसविला. त्या चौथाईच्या उत्पन्नावर जिंकलेल्या प्रदेशाच्या संरक्षणाचा आणि फौजेच्या इतर खर्चाचा भार असे. तिच्यावरून इंग्रजांना तैनाती फौजेची कल्पना स्फुरली होती. महाराजांची फौज किती शिस्तबद्ध होती याची साक्ष त्यांचे हे पत्र देईल.

पावसाळ्याच्या तोंडी त्यांनी सैन्याला ताकीद दिली आहे, ''पावसाळ्याकारणे पागेस सामा व दाणा व वरकड केला होता तो कित्येक खर्च होऊन गेला. परंतु जरूर जाले त्याकरिता कारकुनाकडून व गडोगडी गल्ला असेल तो देववून जैसीतैसी पागेची बेगमी केली आहे. असेल तोवरी धुंदी करून चाराल. मग पडत्या पावसात काही मिळणार नाही. उपास पडतील. घोडी मरावयास लागतील. म्हणजे विलातीस तसवीस देऊ लागाल. तरी रयतेस काडीचा आधार द्यावयाची गरज नाही. घलक पागेचे आहेत, खण धरून राहिले असतील, कोणी आगट्या करतील, कोणी भलतेच जागा चुली रंधनाला करतील, कोणी तंबाकूला आगी घेतील. गवत पडले आहे ऐसे अगर वारे लागले आहे ऐसे मनामन आणिता म्हणजे अविस्त्राच एखादा दगा होईल. रात्रीस दिवा घरात असेल, अविस्त्राच उंदीर वात नेईल, ते गोष्टी न हो. बदनामी ज्यावर येईल त्यास, मराठियाची तो इज्जत वाचणार नाही.
- भवानीशंकर पंडित
source

हत्‍ती व डास यांच लग्न

एकदा एका हत्तीचं एका डासिणीवर (म्हणजे डासाची मादी) प्रेम जडलं. खूप दिवस दोघांचं अफेअर जोरात चाललं. सगळ्या जंगलात या प्रकरणाची चर्चा गाजत राहिली. अखेर हत्तीनं डासिणीच्या वडिलांना भेटून तिला रीतसर मागणी घातली. पण, तिच्या घरच्यांनी लग्नाला प्रचंड विरोध दर्शवला.... का?.... .... सांगा सांगा का? अहो, ते म्हणाले, ''बाकी ठीक आहे, मुलाचे दात फार पुढे आहेत!'' तरीही, घरच्यांच्या विरोधाला न जुमानता दोघांनी लग्न केलं. पण, लग्नाच्या पहिल्या रात्रीच डासिणीचा मृत्यू झाला... ... का?... ... विचार करा... अहो, भलतेसलते विचार करू नका! हत्तीला रात्री 'गुडनाइट' लावून झोपायची सवय होती!!!!

निबंध लिहा - 'गाय'

प्रश्न : निबंध लिहा विषय - 'गाय' एका मुलाने लिहिलेला निबंध : "अमेरिकेमध्ये मुलाला 'गाय' असे म्हणतात. भारतात गवत खाणा-या प्राण्याला गाय असे म्हणतात. गाईला चार पाय आणि दोन कान असतात. गाईचे तोंड गायतोंडे सरांसारखे असते. गायी फावल्या वेळेत शेपटीने माश्या मरतात. मेलेल्या माशांचे सुकड बोंबील करतात. ते टेस्टी असते. गायी गोठ्यामध्ये गाई-गाई करतात. गाय दूध देते पण आम्ही चितळ्यांचे दूध पितो. गाईच्या 'शी'ला शेण असे म्हणतात. शीलाताई शेणाच्या गौ-या करते. गाईच्या पिल्लाला वासरू असे म्हणतात. वसुबारसेला वासराचे बारसे करतात. गाईची पूजा होते. पूजा मला आवडते. ती माझ्या शेजारी बसते. गाईला माता म्हणतात. भारत माता की जय !!!! " Posted by राम इंदुलकर

वरचे न्यायालय

म~सेडोनचा राजा दुसरा फ़िलीप हा अतिशय दारू पीत असे. एअकदा तो असाच दारू पिऊन तर्र जल अस्ता, त्याच्याकडे एक गृहस्थ हुएल व त्याने आअप्लय बायकोविरुध्द खोटीच तर्क्रार केली. राजा फ़िलीपने त्या गृहस्थाच्या बायकोला बोलावून घेऊन वत इचे म्हन्णणे कसएबसे ऎकून घेऊन अतिला शिक्षा फ़र्माविली.
आप्ला अपराध नसता, नाह शिक्षा दिली गेल्यामुले, ती बाई चिडून राजाला म्हणाली, महाराज, आपण दिलेल्या निर्याविरुद्ध मला फ़ेरविचारासाठी वरच्या न्यायालयात अर्ज करावयाचा असल्याने, आपण मला फ़रमविलेलेया शिक्षेची तोवर अंमलबहावणी करु नये.
राजान आश्चर्यानं विचारलं,माझ्या राज्यत मी दिलेल्या निर्यनावर विचार करणारं, वरचं न्यायालय कुठं आहे?
ती बाई धिटपणे म्हणाली, प्यायलेल्या फ़िलीप महाराजांनी मला चुकीची शिक्शा दिली असल्याने, त्या शिक्षेविरुध्द फ़ेरविचार कारण्यासाठी विनंती अर्ज मला न प्यायलेल्या फ़िलीप महाराजांकडे करायचा आहे.
त्या बाईच्या या चातुर्यपूर्ण उत्तरानं वरमलेल्या फ़िलीप राजाने तिला पुन्हा दुसऱ्या दिवशी दरबारात बोलावले.
दुसऱ्या दिवशी न प्यायलेल्या स्थितीत राजदरबारात अलेल्या फ़िलीप राजापुढे त्या बाईने आपली बाजू मांडली आणि आश्चर्य असे की, पूर्ण निर्दोश असल्याचे जाहीर करुन, राजाने तिच्या नवऱ्यालाच त्याने खोटा दावा केल्याबद्दल शिक्षा ठोठावली !

असं असतं का प्रेम?

एका डॉक्‍टरांकडे एक ८०-८५ वर्षांचे म्हातारे गृहस्थ आपल्या जखमेचे टाके काढून घ्यायला गेले. सकाळी ८.३० चा सुमार. ते डॉक्‍टरांना म्हणाले, थोडं लवकर होईल का काम? मला ९ वाजता एकीकडे जायचंय. डॉक्‍टरांसमोर त्या क्षणी काहीच काम नव्हतं. त्यांनी जखम तपासली, सामानाची जमवाजमव केली आणि टाके काढायची तयारी केली. दरम्यान, ते त्या गृहस्थाशी गप्पा मारत होते.


""आजोबा, ९ वाजता दुसऱ्या डॉक्‍टरांची अपॉइंटमेंट आहे का?''

""नाही! मला ९ वाजता माझ्या बायकोबरोबर नाश्‍ता करायला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जायचंय.''

""हॉस्पिटलमध्ये? आजारी आहेत का त्या?''

""हो! गेली पाच वर्षे हॉस्पिटलमध्येच आहे ती.''

""अच्छा! आणि तुम्ही वेळेवर गेला नाहीत, तर वाट पाहतील ना त्या? काळजीही करतील...?''

""नाही डॉक्‍टर. तिला "अल्झायमर्स' झालाय. ती गेली पाच वर्षे कोणालाच ओळखत नाही.'' आजोबा शांतपणे म्हणाले.

डॉक्‍टर चकित होऊन म्हणाले, ""आणि तरीही तुम्ही रोज त्यांच्याबरोबर नाश्‍ता करायला इतक्‍या वेळेवर आणि धडपडून जाता? त्या तुम्हाला ओळखतही नसताना?''

त्यावर पुनः तितक्‍याच शांतपणे म्हातारे गृहस्थ म्हणाले, ""डॉक्‍टर ती मला ओळखत नसली, तरी मी तिला गेली कित्येक वर्षे ओळखतो. माझी बायको आहे ती, आणि माझं जिवापाड प्रेम आहे तिच्यावर.''

ऐकता ऐकता डॉक्‍टरांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. गळा दाटून आला. त्यांच्या मनात आलं, ""हे खरं प्रेम; प्रमे म्हणजे काही नुसतं घेणं नव्हे, तर त्याबरोबर कितीतरी देणं, निरपेक्षपणे स्वतःकडचा आनंद लुटवणं, उधळणं - त्या गृहस्थांसारखं.''

अचानक इंटरनेटवरून आलेल्या अनेक संदेशांमधला एक संदेश डॉक्‍टरांना आठवला-

""चांगल्या लोकांच्या वाट्याला नेहेमीच सगळं सर्वोत्तम येतं असं नाही - पण जे वाट्याला येतं त्यातलं सर्वोत्तम शोधून ते आयुष्य साजरं करतात.''

यालाच आयुष्य म्हणायचं. आपल्या माणसाला आहे तसं स्वीकारणं आणि आपल्या दोन्ही हातांनी, आपल्या सर्वस्वाने त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करणं....

खरंच मिळेल असं प्रेम आपल्याला अन्‌ जमेल का असं प्रेम करणं आपल्याला?...
इ-मेल फॉरवर्ड - आभार - कवि - लेखक

कट्टा- एक व्यक्तीमत्वात बदल घडवणारी जागा......

नमस्कार....
परवा संध्याकाळी फोन आला आणि पलीकडून नेहमीचे शब्द कानावर आले " किती वाजता येणार आहेस?" मग काय नेहमीच्या सवयी प्रमाणे आमची स्वारी निघाली. घरात आलेल्या पाव्ह्ण्यानी कुठे निघालास असे विचारू नये असे वाटत असतानाच त्यांनी विचारले... मी काही बोलण्याच्या आधीच आमच्या बंधुराजांनी उत्तर दिले "कट्ट्यावर....." आणि कट्टा कुठे आहे हे सांगितल्यावर घरी आलेल्या पाव्हण्याच्या चेहेऱ्यावरचे भाव मात्र असे काही विचित्र झाले होते की जणू काही आत्ता हा(म्हणजे मी) खून करायला निघाला आहे.....

कट्टा हा शब्द एव्हढा बदनाम असण्याचे कारण काहीही असो... पण सगळेच कट्टे असे बदनाम का? मी पाहिलेल्या कट्ट्यांवर अनेक प्रकराची माणसे येत असतात... अशा कट्ट्यांवर काही "permanent आणि काही temporary member " असतात. माझे असे स्पष्ट मत आहे की कट्टा हे सुद्धा एक व्यसन आहे. माझ्या या मताला अनेक कट्टेकरी मान्य करतील. असे का? अनेक कट्टेकरींची मानसिक स्थिती काहीशी अशी असे......

"रोज कट्ट्यावर जाण्याची वेळ झाली अस्वस्थपणा वाढू लागतो आणि मग खिशातून फोन बाहेर काढला जातो आणि नेहमीच्या मित्रांकडे येणार असल्याची चौकशी करणारा संदेश पाठवला जातो. उत्तराची वाट बघता बघता निघण्याची तयारी होते... आणि मग................"

कट्टा ही काही फक्त तरुणाईची मक्तेदारी आहे असा समज करून घेण्याचे कारण नाही..... रोज संध्याकाळी कीर्तन अथवा भजन साठी जमणाऱ्या ६०-७० वर्षे वयाच्या आज्जी आजोबांसाठी मंदिर म्हणजे कट्ट्याचेच एक रूप आहे....कट्टा आपल्याला मनाने तरुण राहायला मदत करतो... असे जर नसते तर पुण्यातील फर्ग्युसन रस्ता हा वर्षनुवर्षे तरुणाईचा अखंड वाहणारा झरा म्हणून ओळखला गेला नसता....

कट्टा एक अशी जागा ज्या ठिकाणी आपली मते, आपले विचार आणि विचार करण्याची पद्धत ( thought process) एकतर अमुलाग्र बदलते किंवा अधिक पक्की होते. कट्ट्यावर अनेक वेळा वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होत असतात. विषय कोणताही असो पण सर्व बाजूंनी चर्चा होत असतात.मग विषय सोमोरून जाणारे सौंदर्य स्थळ असेल नाहीतर जागतिकीकरण असेल... पण कट्ट्यावर येणाऱ्या प्रक्तेकाची स्वतःची अशी काही मते असतात...ती चर्चेतून समोर आली की स्वतःची मते तपासून बघण्याची संधी मिळते...अर्थात दरवेळेला असे होतेच असे नाही... पण या जागेवर येण्याने(हो हो.... नुसत्या उपस्थितीने सुद्धा.....) आपल्या जाणीवा समृद्ध होतात. कट्ट्यावर अनेक मित्र भेटतात... कधीतरी असेही कळून जाते की आपल्या बरोबर नेहमी हसऱ्या चेहेर्याने वावरणाऱ्या मित्राला बऱ्याच समस्या आहेत.. आणि मग आपण आपल्या समस्यांचे रडगाणे गाण्यापेक्षा त्यांना हसतमुख राहून तोंड देण्याचा विचार करू लागतो.....कधी कोणाचे राहणीमान आपल्यावर प्रभाव पडून जाते तर कधी कोणाचे शब्द तर कोणाचे विचार..... एकमेकांची टांग खेचताना ( याला चांगल्या शब्दात मस्करी करणे म्हणतात...) आपण दिवसभराचा थकवा, कटकटी, भानगडी, व्याप तणाव ( म्हणजे tensions ) विसरून जातो. त्यावेळी " आत्ताचा क्षण जगणे" म्हणजे काय याचा अर्थ कळतो. कट्ट्यावर जाणाऱ्या व्यक्तीचे निरीक्षण करताना असे लक्षात येते, की थोड्या दिवसात एकदम शामळू किंवा लाजाळू (याला काही जण एकलकोंडा वगैरे म्हणतील) व्यक्ती सुद्धा लोकांत व समाजात सहजपणे मिसळू लागला आहे...

कट्ट्यावर येणाऱ्यांसाठी कट्टा ही व्यक्तीमत्वात बदल घडवणारी जागा आहे अर्थात सोबतीला असणारी संगत ही पण या सगळ्या प्रक्रियेत महत्वाचे काम करते. जर चांगली संगत असेल तर तरुणाई (तन आणि मन या दोन्ही अर्थांनी) च्या माध्यमातून अनेक चांगली कामे केली जाऊ शकतात याची अनेक उदाहरणे आहेत पण त्याबरोबरच जर संगत चुकीची असेल तर चांगली मुले/मुली वाया जाऊ शकतात. कट्टा ही जागा अशी असते ज्या ठिकणी संगतीमुळे किंवा बघून बघून व्यसने लागण्याची शक्यता असते. याचा अर्थ असा नाही की कट्ट्यावर जाणारे सगळेच अगदी ठार व्यसनी असतात असे नाही.

ज्या लोकांना कट्टा नावाची काही तरी गोष्ट असते हे फक्त ऐकून माहित असते त्यांनी कोणत्याही कट्टेकरी व्यक्तीला सुधारला अथवा बिघडला असे कोणतेही विशेषण चिटकावण्याच्या फन्दांत पडू नये काहीही फायदा होणार नाही...... आणि कट्टेकरी लोकांनी व. पु. काळे यांचे एक वाक्य लक्षात ठेवावे. " माणूस बिघडला असे आपण म्हणतो याचा अर्थ तो माणूस आपल्याला हवे तसे वागत नाही......!!! "

आभार - - चेतन कुलकर्णी
[ई-मेल फॉरवर्ड ]

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

स्वागत नववर्षाचे,
आशा आकांक्षाचे,
सुख समॄद्धीचे,
पडता द्वारी पाऊल गुढीचे
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

श्रीखंड पुरी
रेशमी गुढी,
लिंबाचे पान,
नववर्ष जावो छान
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!


आरंभ होई चैत्रमासीचा
गुढ्या तोरणे सण उत्सवाचा
कवळ मुखी घालू गोडाचा
साजरा दिन हो गुढीपाढव्याचा!
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!


नवे वर्ष नवी सुरुवात
नव्या यशाची नवी रुजवात
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!


कार्याची घ्या उंच उडी,
उभारा यशोकिर्तीची गुढी
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!


आधी वंदूया लंबोदरा, नमुया प्रभाती दिनकरा
सर्वधारीनाम संवत्सरा, शुभारंभ नववर्षजागरा !
जुन्यातले नवे ठेवुन,सर्वांगी नवपालवी लेऊन
नव्याची ओढ सनातन, पुरवो हे वर्ष नूतन !
साडेतीन मुहुर्तांपैकी एक, गुढीपाडवा सण सुरेख
या मंगलदिनी काही एक, शुभकार्य अवश्य करावे..
येत्या वर्षी नवीन घडूद्या , टाकाऊ ते सारे झडूद्या
मंगलवार्ता कानी पडूद्या , गुढी यशाची नवी चढूद्या.
नववर्षी इतिहास घडवा, कर्तॄत्त्वाचे इमले चढवा
माणसांतले मैत्र वाढवा- सुरुवात आजच...गुढीपाडवा !

सोनपिवळ्या किरणांनी आले नववर्ष
मराठी मन्मनी दाटे नववर्षाचा हर्ष
गुढीपाडव्याच्या सोनपिवळ्या शुभेच्छा!


सोनपिवळा स्पर्श
हिरव्या गर्दिला स्रूजनांचा हर्ष
कुणाच्या स्वागता हा सोहळा?
गुढीपाडव्याचा मुहुर्त आगळा,
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

प्रेमाचे संदेश

आता पुरे झालं रे तुझं
असं मला शब्दांनी छ्ळणं.
सलत नाही का तुला कधी
माझं तुझ्यासाठी निरंतर जळणं.
रात्र अशी बहरुन जाते
चांदण्यांचा सडा शिंपताना
स्वप्नातली तू आठवतेस; पहाटे
अंगणातला पारिजात वेचताना.
तुझी वाट बघून थकलेल्या,
डोळ्यांना आता निजवतो आहे.
तुझ्या माझ्या भेटीसाठी,
स्वप्नांचा गाव सजवतो आहे.
एकदा भर मला डोळ्यांत तुझ्या
आणि घे डोळे मिटुन
बघ कळतयं का तुला की,
तुझ्यासाठी इतके शब्द मी आणतो कुठुन !
नेहमी तुला विसरायचं ठरवुन
नेहमी तुला आठवत राहते
स्व:ताला कधी विसरता येतं का?
उमगुन मग स्वःतावर हसत राहते!
रात्री चंद्र असा सजला होता
तार्‍यांनी चिंब भिजला होता
बस्स, तुझ्या येण्याचा अवकाश
पाहुन तुला बिच्यार्‍याचा चेहरा पडला होता.
तु नसतेस तेव्हा,
चांदण्याही काळोखात
हरवलेल्या असतात.
चंद्राचं वेड नाही मला,
फक्त तु असावी शेजारी
जेव्हा तारे वाट चुकतात.
घेता जवळी तु मला,
पारिजात बरसत राहतो.
हळव्या क्षणांच्या कळ्या,
देहावर फुलवत राहतो!
पडता कानी तुझ्या बासरीचे सुर
हरपला जीव, धडधडला उर
का भासे मज तु कोसों दुर
वाहशी जरी होउनी डोळ्यांतला पुर !
एक थेंब अळवावरचा,
मोत्याचं रुप घेउन मिरवतो.
एक थेंब तुझ्या ओठांवरचा
माझं जग मोत्यांनी सजवतो.
दिवा दिसताच प्रकाश मागणे
पक्षी दिसताच आकाश मागणे
हा स्वभाव बरा नाही!
ज्योती जळतात माझ्याचसाठी
पक्षी उडतात माझ्याचसाठी
हा समज खरा नाही!
रात्री आकाश ओसंडुन
गेले होते तार्‍यांनी,
मी तुला शोधत उभा तर
वेड्यात काढले मला सार्‍यांनी!
तुझ्यापासुन सुरु होउन
तुझ्यातच संपलेला मी,
माझे मीपण हरवून,
तुझ्यात हरवलेला मी…
कधी सांजवेळी
मला आठवूनी
तुझ्या भोवताली
जराशी वळूनी
पाहशील का???
माझे सोन्याचे आभाळ,
माझी सोनेरी संध्याकाळ…
सये माझ्या गळ्यातली
सोनियाची तु माळ…
असेन तुझा अपराधी,
फक्त एकच सजा कर.
मला तुझ्यात सामावून घे
बाकी सर्व वजा कर….
डोळ्यांत साठलेल्या तुझ्या आठवणी
रात्र ही सरता सरेना,
किती दिस लोटले तुला पाहुन
स्वप्नात तरी ये ना !!!
असतिल लाख कृष्ण
कालिंदिच्या तटाला
राधेस जो मिळाला
तो एकटाच उरला…
शब्द सारे संपलेले सांगण्या नुरलेच काही,
मौन झाले अधर आता बोलण्या हितगुज काही..
विखुरलेली स्वप्ने सारी का उगा तु जुळविशी
का काळाने दिलेली भेट ह्रदयी कवटाळीशी….
एकच बायको असावी सुंदर आणि तरुण,
एकच अकांउट असावे पैशाने भरुन,
एकच फ्लॅट असावा तो पण फुल पेमेंट करुन,
अजुन काय हवे
…….मुलीच्या बापाकडुन????
माझे काही प्रश्न जे तुझ्याकडुन अनुत्तरित आहेत,
ते ताबडतोब्,जसेच्या तसे मला परत कर…
लोक ओरड मारतात…..
….पेपर फुटला म्ह्णणुन….!
माझा प्रत्येक शब्द मी,
तुझ्या ओंजळीत टाकतोय..
भरुन जाउ दे ओंजळ तुझी,
तुझ्यासाठी नवीन शब्द शोधतोय…
रोजच्यासारखी ती शांत सांज
तु दुर पाठमोरी जात होती
हरवले ते जे माझे न होते
का सागराची खारी लाट डोळ्यात होती
मंतरलेले दिवस आणि मंतरलेल्या रात्री
तुझ्या आठवणी साठलेल्या डोळ्यात, पाणी माझ्या गात्री…
तुझ्या डोळ्यांना समजावून ठेव,
ते नेहमी मला वेड लावतात.
तसा मी आहे थोडा वेडा,
पण ते चारचौघातही मला वेड्यात काढतात..
माहीत आहे मला
तु रडतानाही हसण्याचा प्रयत्न करतेस
माझे अश्रु तुझ्या डोळ्यातुन
अलगद पुसण्याचा प्रयत्न करतेस…
भाव मनीचे कळले तुला
आणखी मला काय हवं
तुझे काय आणि माझे काय
अश्रुंनी सु्द्धा मन जुळायला हवं…
तुझ्यापासुन सुरु होउन
तुझ्यातच संपलेला मी,
माझे मीपण हरवून,
तुझ्यात हरवलेला मी…
तुझं मन माझं मन डोंगर दर्‍यांची रांग
तुझं प्रेम माझं प्रेम वेगळं आहे का सांग….
वेगळं असेल तर निघुन जाउ आपापल्या वाटेने..
एकच असेल तर विरुन जाउ एकमेकांच्या मिठीमध्ये….
सुर्यबुडीचा अंधार
हिमनगात पारवा
विश्वस्पंदाने भारतो
तिच्या कुशीच्या गारवा…
तुला माझे घर तुझे वाटले ;
माझ्या वस्तूही ,
असेही वाटले तुला की तू या
औदुंबरी वास्तूत
राहून गेली आहेस…
शरीराशी शरीर घासूनही; वासनेशी
वासना तासूनही अशी
प्रतीती येत नाही, मग तू इतके
साधे कसे सांगतेस ?
मला उलगडत नाही.
मला अजूनही बापुडे वाटते-
पायावरची मेंदी, दारावर काढायला हवी
होतीस, कडकडून मिठी, तीही द्यायला
हवी होतीस/कदाचित मला सर्वत्र संध्याकाळी,
बिलगणाऱ्या स्तोत्रांची गीते गाता
आली असती-
हे सोपे शरीर, हा निर्व्याज आत्मा
जस्साच्या तस्सा, डोलकाठीवरच्या झुलत्या
पक्ष्यासारखा गोंजारता आला असता…
- ग्रेस
इथेच टाकतो पुन्हा सुजाण दु:ख येथले
तुझ्या कुशीत बळ अन मनात रक्त फाटले….
- ग्रेस
चल जाउ दुर कुठे तरी, हातात असु दे हात…
भर रस्त्यामध्ये माझा होणार कधीतरी घात !
ये माझ्या मिठीत आपण मरुन जाउ ठार,
भुतकाळ, वय, संसार जुन्या खंती अपरंपार….
नकोत गिल्टड्रीप्स स्मृतिंच्या रानात
जळुन गेल्यावर जी सगळी होते राख,
तितकं हलकं व्हायचयं या प्रेमात.
संवादातुन काढुन टाकू बाजुला
हेतुंचे काटे स्किलफुली
नाही तर जानेमन,
कशाला प्रेमाच्या नावाखाली
प्रेतांच्या जिवंत बोलाचाली…….
पहिला पाउस, पहिली सर्…..सोबत तुझी असावी….
चिंब बाहुंच्या कवेत शिरण्या मुंगीस जागा नसावी…….
सांगु कशी कुणाला कळ आतल्या जीवाची,
चिरदाह वेदनेचा मज श्राप हाच आहे….
किरीमिजी वळणाचा धुंद पाउस येतो,
निळसर कनकाचे दिप हायी देतो..
ह्रदय सजविणारा मित्र नाही उशाशी,
घनभर घन झाले आता ये ना जराशी……
- ग्रेस
खुलासे अधुरेच राहतात आणि निघायची वेळ होते…
दिसणार नाही इतुके पुसट डोळ्यांमध्ये दव तरळते….
दारामधुन निरोपादाखल्हात माझा हालत राहतो…
आणि एकाएकी तुझ्या वाटेलाच वळण येते….
देहावर चालुन आले युद्धातिल दिलवर सारे
उल्केसम कोसळणारे नसतात इमानी तारे…..

या सर्व कविता श्री. दीपक परुळेकर यांच्या आहेत.
जर कुणाची काही हरकत असल्यास write@marathit.com वर कळवावे.

प्रेम संदेश







 
या वेबसाईट वर प्रसिद्ध झालेले लेख, कविता, विनोद आणि इतर गोष्टी हे सर्व निरनिराळ्या माध्यमातून घेतले आहेत.