Marathit Logo प्रेमाचे संदेश ~ Marathit

प्रेमाचे संदेश

आता पुरे झालं रे तुझं
असं मला शब्दांनी छ्ळणं.
सलत नाही का तुला कधी
माझं तुझ्यासाठी निरंतर जळणं.
रात्र अशी बहरुन जाते
चांदण्यांचा सडा शिंपताना
स्वप्नातली तू आठवतेस; पहाटे
अंगणातला पारिजात वेचताना.
तुझी वाट बघून थकलेल्या,
डोळ्यांना आता निजवतो आहे.
तुझ्या माझ्या भेटीसाठी,
स्वप्नांचा गाव सजवतो आहे.
एकदा भर मला डोळ्यांत तुझ्या
आणि घे डोळे मिटुन
बघ कळतयं का तुला की,
तुझ्यासाठी इतके शब्द मी आणतो कुठुन !
नेहमी तुला विसरायचं ठरवुन
नेहमी तुला आठवत राहते
स्व:ताला कधी विसरता येतं का?
उमगुन मग स्वःतावर हसत राहते!
रात्री चंद्र असा सजला होता
तार्‍यांनी चिंब भिजला होता
बस्स, तुझ्या येण्याचा अवकाश
पाहुन तुला बिच्यार्‍याचा चेहरा पडला होता.
तु नसतेस तेव्हा,
चांदण्याही काळोखात
हरवलेल्या असतात.
चंद्राचं वेड नाही मला,
फक्त तु असावी शेजारी
जेव्हा तारे वाट चुकतात.
घेता जवळी तु मला,
पारिजात बरसत राहतो.
हळव्या क्षणांच्या कळ्या,
देहावर फुलवत राहतो!
पडता कानी तुझ्या बासरीचे सुर
हरपला जीव, धडधडला उर
का भासे मज तु कोसों दुर
वाहशी जरी होउनी डोळ्यांतला पुर !
एक थेंब अळवावरचा,
मोत्याचं रुप घेउन मिरवतो.
एक थेंब तुझ्या ओठांवरचा
माझं जग मोत्यांनी सजवतो.
दिवा दिसताच प्रकाश मागणे
पक्षी दिसताच आकाश मागणे
हा स्वभाव बरा नाही!
ज्योती जळतात माझ्याचसाठी
पक्षी उडतात माझ्याचसाठी
हा समज खरा नाही!
रात्री आकाश ओसंडुन
गेले होते तार्‍यांनी,
मी तुला शोधत उभा तर
वेड्यात काढले मला सार्‍यांनी!
तुझ्यापासुन सुरु होउन
तुझ्यातच संपलेला मी,
माझे मीपण हरवून,
तुझ्यात हरवलेला मी…
कधी सांजवेळी
मला आठवूनी
तुझ्या भोवताली
जराशी वळूनी
पाहशील का???
माझे सोन्याचे आभाळ,
माझी सोनेरी संध्याकाळ…
सये माझ्या गळ्यातली
सोनियाची तु माळ…
असेन तुझा अपराधी,
फक्त एकच सजा कर.
मला तुझ्यात सामावून घे
बाकी सर्व वजा कर….
डोळ्यांत साठलेल्या तुझ्या आठवणी
रात्र ही सरता सरेना,
किती दिस लोटले तुला पाहुन
स्वप्नात तरी ये ना !!!
असतिल लाख कृष्ण
कालिंदिच्या तटाला
राधेस जो मिळाला
तो एकटाच उरला…
शब्द सारे संपलेले सांगण्या नुरलेच काही,
मौन झाले अधर आता बोलण्या हितगुज काही..
विखुरलेली स्वप्ने सारी का उगा तु जुळविशी
का काळाने दिलेली भेट ह्रदयी कवटाळीशी….
एकच बायको असावी सुंदर आणि तरुण,
एकच अकांउट असावे पैशाने भरुन,
एकच फ्लॅट असावा तो पण फुल पेमेंट करुन,
अजुन काय हवे
…….मुलीच्या बापाकडुन????
माझे काही प्रश्न जे तुझ्याकडुन अनुत्तरित आहेत,
ते ताबडतोब्,जसेच्या तसे मला परत कर…
लोक ओरड मारतात…..
….पेपर फुटला म्ह्णणुन….!
माझा प्रत्येक शब्द मी,
तुझ्या ओंजळीत टाकतोय..
भरुन जाउ दे ओंजळ तुझी,
तुझ्यासाठी नवीन शब्द शोधतोय…
रोजच्यासारखी ती शांत सांज
तु दुर पाठमोरी जात होती
हरवले ते जे माझे न होते
का सागराची खारी लाट डोळ्यात होती
मंतरलेले दिवस आणि मंतरलेल्या रात्री
तुझ्या आठवणी साठलेल्या डोळ्यात, पाणी माझ्या गात्री…
तुझ्या डोळ्यांना समजावून ठेव,
ते नेहमी मला वेड लावतात.
तसा मी आहे थोडा वेडा,
पण ते चारचौघातही मला वेड्यात काढतात..
माहीत आहे मला
तु रडतानाही हसण्याचा प्रयत्न करतेस
माझे अश्रु तुझ्या डोळ्यातुन
अलगद पुसण्याचा प्रयत्न करतेस…
भाव मनीचे कळले तुला
आणखी मला काय हवं
तुझे काय आणि माझे काय
अश्रुंनी सु्द्धा मन जुळायला हवं…
तुझ्यापासुन सुरु होउन
तुझ्यातच संपलेला मी,
माझे मीपण हरवून,
तुझ्यात हरवलेला मी…
तुझं मन माझं मन डोंगर दर्‍यांची रांग
तुझं प्रेम माझं प्रेम वेगळं आहे का सांग….
वेगळं असेल तर निघुन जाउ आपापल्या वाटेने..
एकच असेल तर विरुन जाउ एकमेकांच्या मिठीमध्ये….
सुर्यबुडीचा अंधार
हिमनगात पारवा
विश्वस्पंदाने भारतो
तिच्या कुशीच्या गारवा…
तुला माझे घर तुझे वाटले ;
माझ्या वस्तूही ,
असेही वाटले तुला की तू या
औदुंबरी वास्तूत
राहून गेली आहेस…
शरीराशी शरीर घासूनही; वासनेशी
वासना तासूनही अशी
प्रतीती येत नाही, मग तू इतके
साधे कसे सांगतेस ?
मला उलगडत नाही.
मला अजूनही बापुडे वाटते-
पायावरची मेंदी, दारावर काढायला हवी
होतीस, कडकडून मिठी, तीही द्यायला
हवी होतीस/कदाचित मला सर्वत्र संध्याकाळी,
बिलगणाऱ्या स्तोत्रांची गीते गाता
आली असती-
हे सोपे शरीर, हा निर्व्याज आत्मा
जस्साच्या तस्सा, डोलकाठीवरच्या झुलत्या
पक्ष्यासारखा गोंजारता आला असता…
- ग्रेस
इथेच टाकतो पुन्हा सुजाण दु:ख येथले
तुझ्या कुशीत बळ अन मनात रक्त फाटले….
- ग्रेस
चल जाउ दुर कुठे तरी, हातात असु दे हात…
भर रस्त्यामध्ये माझा होणार कधीतरी घात !
ये माझ्या मिठीत आपण मरुन जाउ ठार,
भुतकाळ, वय, संसार जुन्या खंती अपरंपार….
नकोत गिल्टड्रीप्स स्मृतिंच्या रानात
जळुन गेल्यावर जी सगळी होते राख,
तितकं हलकं व्हायचयं या प्रेमात.
संवादातुन काढुन टाकू बाजुला
हेतुंचे काटे स्किलफुली
नाही तर जानेमन,
कशाला प्रेमाच्या नावाखाली
प्रेतांच्या जिवंत बोलाचाली…….
पहिला पाउस, पहिली सर्…..सोबत तुझी असावी….
चिंब बाहुंच्या कवेत शिरण्या मुंगीस जागा नसावी…….
सांगु कशी कुणाला कळ आतल्या जीवाची,
चिरदाह वेदनेचा मज श्राप हाच आहे….
किरीमिजी वळणाचा धुंद पाउस येतो,
निळसर कनकाचे दिप हायी देतो..
ह्रदय सजविणारा मित्र नाही उशाशी,
घनभर घन झाले आता ये ना जराशी……
- ग्रेस
खुलासे अधुरेच राहतात आणि निघायची वेळ होते…
दिसणार नाही इतुके पुसट डोळ्यांमध्ये दव तरळते….
दारामधुन निरोपादाखल्हात माझा हालत राहतो…
आणि एकाएकी तुझ्या वाटेलाच वळण येते….
देहावर चालुन आले युद्धातिल दिलवर सारे
उल्केसम कोसळणारे नसतात इमानी तारे…..

या सर्व कविता श्री. दीपक परुळेकर यांच्या आहेत.
जर कुणाची काही हरकत असल्यास write@marathit.com वर कळवावे.
Labels: ,

 
या वेबसाईट वर प्रसिद्ध झालेले लेख, कविता, विनोद आणि इतर गोष्टी हे सर्व निरनिराळ्या माध्यमातून घेतले आहेत.