Marathit Logo नदीप्रणाली : ~ Marathit

नदीप्रणाली :

नदीप्रणाली :
कोणत्याही प्रदेशातील मुख्य नदी, तिला मिळणार्‍या उपनद्या, उपनद्यांना मिळणार्‍या साहाय्यक नद्या आणि साहाय्यक नद्यांना मिळणारे नाले-ओढे या सर्व लहान - मोठ्या प्रवाहांचा वाहण्याचा जो विशिष्ट क्रम असतो, या प्रवाहांच्या जाळ्यालाच नदीप्रणाली असे म्हणतात.

महाराष्ट्रात सह्याद्रीने केलेल्या जलविभाजनामुळे पूर्ववाहिनी व पश्चिमवाहिनी नद्या वाहतात. सातमाळा - अजिंठा डोंगररांगा, हरिश्र्चंद्र-बालाघाट डोंगररांगा व शंभू महादेव डोंगररांगा या उपजलवविभाजकांमुळे अनुक्रमे गोदावरी, भीमा व कृष्णा नद्या पठारावरून पूर्वेकडे वाहतात. उत्तर महाराष्ट्रात पूर्व ते पश्चिम या दिशेने तापी-पूर्णा व नर्मदा या नद्या वाहत जातात, तर कोकणात वैतरणा, उल्हास, सावित्रीसारख्या आखूड लांबीच्या नद्या पश्चिमेस वाहत जाऊन अरबी समुद्रास मिळतात.

प्रमुख नद्या - गोदावरी, भीमा, कृष्णा, पैनगंगा, वर्धा, वैनगंगा, नर्मदा, तापी, मांजरा, सीना.
यापैकी काही नद्यांची माहिती पुढीलप्रमाणे -
नदीचे नाव उगमस्थान .... या जिल्ह्यातून जाते
गोदावरी त्र्यंबकेश्वर (नाशिक) नाशिक, नगर, औरंगाबाद, परभणी, नांदेड
भीमा भीमाशंकर (पुणे) पुणे, सोलापूर
कृष्णा महाबळेश्वर (सातारा) सातारा, सांगली, कोल्हापूर
तापी सातपुडा पर्वतरांगा (मुलताई), मध्यप्रदेश अमरावती, अकोला व बुलढाणा, वाशिम, जळगांव, धुळे, नंदुरबार
प्रमुख नद्यांची खोरी : गोदावरी खोरे, भीमा खोरे, कृष्णा खोरे, तापी खोरे, पैनगंगा खोरे, वर्धा खोरे, वैनगंगा खोरे व मांजरा खोरे.
Labels:

0 comments:

Post a Comment

 
या वेबसाईट वर प्रसिद्ध झालेले लेख, कविता, विनोद आणि इतर गोष्टी हे सर्व निरनिराळ्या माध्यमातून घेतले आहेत.