Marathit Logo मला प्रेम जमलेच नाही ~ Marathit

मला प्रेम जमलेच नाही

मला प्रेम जमलेच नाही.......!हो मला प्रेम कधी जमलेच नाहीतिच्या शिवाय मन माझ कशात रमलच नाही!१!माझ्या मनातसारखा तिचाच विचारतिच्या, मात्र मित्रांशीफोनवर गप्पाच फार!२!तिला हसवण्यासाठी करायचोमी जीवाचे रान,ती म्हणते कशाला देतोसमला फुकटचा त्राण!३!तिला खरचटले तरीव्हायचा हृदयावर घाव,ती म्हणते कशाला आणतोसचेहऱ्यावर काळजीचा आव!४!फोन करायचो तिलावाटायची तिची काळजी,ती म्हणते परीक्षा असून फोनवर बोलतोसअसा कसा तू निष्काळजी!५!तिला सांगायला गेलोमाझे आहे तुझ्यावर प्रेम,ती म्हणते तुझे नाही काआयुष्यात कोणते aim!६!तिला वाढदिवसाला भेटायला गेलोभर उन्हात तापत,ती म्हणते, मी मित्राच्याघरी आहे केक कापत!७!३वर्षे झाली आज, मीगुजरातला नोकरी करत आहे,माझ्या प्रेमाशिवाय मीएकाकी जीवन जगात आहे!८!काल आठवण आली म्हणूनतिच्या घरी रिंग केली,तिच्या आईकडून मलावेगळीच बातमी कळली!९!मी जायच्या दुसरयादिवशीच ती आजारी पडली,अन माझ्या विरहाच्यातीव्र दुखानेच देवाघरी गेली!१०!तिचे अव्यक्त शब्द कळलेच नाहीतिच्या मनातील भाव ओळखलेच नाहीतिच्या डोळ्यातील प्रेम जाणलेच नाहीम्हणून, मला प्रेम कधी जमलेच नाही!११!मला प्रेम कधी जमलेच नाही.......!!!
Labels:

0 comments:

Post a Comment

 
या वेबसाईट वर प्रसिद्ध झालेले लेख, कविता, विनोद आणि इतर गोष्टी हे सर्व निरनिराळ्या माध्यमातून घेतले आहेत.