स्वप्न परी
जडावल्या पापणीला झोपेचे डोहाळेअंधातरी स्वप्नाना पापणीचे झोपाळेझोपाळ्यात चंद्राला हलकेच जोजवेस्पर्षाच्या भाषेत हर्षाचे सोहळॆमनाच्या आभाळी चांदण्याचे सडेचांदणी सड्यात भावनांचे कडेभावनांच्या कड्यात झुले मोरपिसारेअंधारा पल्याड गोड सुस्कारेपहाट वारा पांघरुण घालेसख्यासोबती तिचे हितगुज चालेकिनार जरतारी गालात आलीओठाची दुमड विलग झालीचेहरा झाकला काळ्या कुंतलेपहाट आभा लोचनी बोले लोचनाची भाषा लोचनाला कळेस्वप्नपरीचे होते जग निराळेजगात तिच्या सुंदर आरासस्वनाचे होते जग ते खासकल्पी जोशी
Labels:
काव्यसंग्रह
0 comments:
Post a Comment