उद्या कोणी पाहिला?
हे तरुण रात्री तुला पाहुदे मन भरूनी आज,काय माहित कोण जाणेउद्या कोणी पाहिला?तू उधळ गं तुझे रंगआकाश भरूनसाठवू दे आजच ते ही डोळ्यांत कायमचेकाय माहित उद्या कोणी पाहिला?तु दावतेस आशा मलापरत पाहण्याची उद्या,पण काय सांगू तुला,त्या विधात्याच्या 'मनातलाडाव' कोणी पाहिला?हो ना गं तू तरूण अजूनतुला आज डोळ्यांत साठवू दे.एवढीच इच्छा माझी तू आज पूरी होऊ देतू उधळ तुझे रंग मी बघायला तयार आहेजरी सगे-सोयरे माझेनिद्रेत घायाळ आहेकाय माहीत उद्या कोणी पाहिला?ए चांदणे तू मला का गं आज एकटी खुणवतेय अशी ?बोलव ना तुझ्या त्या सोबत्यालाका तोही गेला तुला सोडून आजमाझ्या...माझ्या. लाडक्या प्रिये सारखा?परत येण्याचं आश्वासन देऊन'उद्या'ची आशा दावून!माझी 'उद्या' आज संपण्यावर आली गंम्हणून पाहतोय तुला आज माझ्या प्रियेच्या रूपानंकाय माहित कोण जाणेउद्या कोणी पाहिला? ..........मुकेश बिह्राडे
Labels:
काव्यसंग्रह
0 comments:
Post a Comment