Marathit Logo त्या प्रेमाची आठवण........! ~ Marathit

त्या प्रेमाची आठवण........!

त्या प्रेमाची आठवण...!मी बरसलो आज शब्दांतुन ,तीला एकही शब्द ना कळला कधीमी ओघळलो आज डोळ्यांतुन ,तीचा थेबंही ना गळला कधी.सोडुन मान सन्मान माझा मीच दगडापुढे हात जोडीले मी कोसळलो दरड होऊन ,तीचा एकही बुरुज ना ढळला कधी.तीची एकही बोली नाही आज लिलावात या माझ्यामी बसलो बाजार मांडून ,तीने भाव माझा ना विचारला कधी.आयुष्यभर तीच्या कुपंणाबाहेर जागा माझी नित्याचीमी राहीलो कुंपण बनुन ,तीने हा निवडूंग अंगणात ना लावला कधी.सा-याच राती तीच्या चादंण्याच्यां मिठीत गेल्या मी जगलो काजवा होऊन ,तीला उजेड माझा ना दिसला कधी.आठवतय रोज जाळं तीच पसरवण तळ्यात चद्रंबिबांसाठीमी राहीलो शिपलं बनुन ,माझ्यातला मोती तीने ना शोधला कधीमी होतो पाखरु जळणारा ती ज्योत होती मला जाळणारी मी जळालो पाखरु बनुन ,तिला एकही चटका ना लागला कधी.मी लाचार इतका की आज माझीच कीव मज यावीमी मला दिले आगीत झोकून ,तीचा धुराकडेही जिव ना वळला कधी.आता मज नकोच तिच्या प्रेमाच्या उसण्या त्या थापामी चाललो स्वप्न मोडुन ,तीने स्वप्नांतही मला ना सोडला कधी।
Labels:

0 comments:

Post a Comment

 
या वेबसाईट वर प्रसिद्ध झालेले लेख, कविता, विनोद आणि इतर गोष्टी हे सर्व निरनिराळ्या माध्यमातून घेतले आहेत.